वाशी / प्रतिनिधी-

 तालुक्यातील सरमकुंडी येथील उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी चे जिल्हा सरचिटणीस  शामराव भोसले  यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी घाटकोपर मुंबई च्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श नेता राजरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला  आहे. 

या पुरस्कारचे वितरण पुणे येथे 20 नोव्हेंबर 2022 रोजी पद्मश्री डॉ. विजकुमार शहा यांच्या आध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या अकादमी कडून महाराष्ट्रातील शैक्षनिक, राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, संस्कृतिक, सहकार, उद्योग, क्रीडा, कृषी, साहित्यिक आणि  संप्रदायिक या क्षेत्रातील गुणिजन गौरव पुरस्कार साठी नामांकन प्रस्ताव मागविन्यात आले होते शामराव भोसले यांनी देखील राजस्तरीय आदर्श नेता राजरत्न पूरस्कारसाठी नामाकंन प्रस्ताव या अकादमी कडे सादर केला होता त्याच्या प्रस्तवाची छाननी करून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे ते गेल्या 20 वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे निस्वार्थीपणे आणि निष्ठेने सक्रिय काम करतात पुरस्कार साठी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे  कार्याध्यक्ष बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, संघटक राजाभाऊ शेरखाने, सेवा दल अध्यक्ष विलास शाळू, प्रदेश युवक उपाध्यक्ष शरण पाटील, युवक अध्यक्ष चंद्रशेखर पवार, सरचिटणीस अवधूत क्षीरसागर, अमर तागडे, महिला जिल्हा सरचिटणीस स्नेहल स्वामी, लोकमान्य शिक्षण संस्थेचे कार्यवाह अनिल खोसे, मुख्याध्यापक कुलकर्णी सर, मित्रपरिवार आणि ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


 
Top