तुळजापूर  /  प्रतिनिधी -

  तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व  देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून सेवा पंधरवड्याअंतर्गत “स्वच्छता हीच सेवा” हा उपक्रम राबविण्यात आला. मी गावांसाठी,गाव माझ्यासाठी,माझे श्रमदान गावाच्या स्वच्छतेसाठी,अशी शपथ ग्रामस्थांनी ग्रामपंचायत समोर घेऊन गावातील अंतर्गत परिसर स्वच्छ करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच ज्योतीका चव्हाण, अमृता चव्हाण, पांडुरंग चव्हाण, शिवाजी चव्हाण पोलीस पाटील, गणेश राठोड, शिवाजी हिरा चव्हाण, हरिदास राठोड, देविदास चव्हाण, सुभाष चव्हाण,बाबु जाधव,भिल्लु राठोड,शंकर चव्हाण, देविदास राठोड, सिताराम राठोड, शिवाजी जाधव,रेश्मा चव्हाण, ग्रामसेवक अविनाश खुंटेगावे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top