तुळजापूर  / प्रतिनिधी-

 शहरातील युवा उद्योजक दिनेश अग्रवाल यांचा वतीने अश्विन पोर्णिमा यात्रेतील भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन  नळदुर्ग रोड येथे  करण्यात आले . दोन दिवस चालणाऱ्या या महाप्रसादाचा शनिवारी (दि. ०८) शुभारंभ करण्यात आला आहे. 

   या कालावधीत प्रत्येक वेळी वेगवेगळ्या भाज्यांची मेजवानी असणार आहे. अग्रवाल यांचे महाप्रसादाचे सलग आठवे वर्ष आहे.     या महाप्रसादाचा शुभारंभ अग्रवाल यांचा हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उद्योजक, मुकुंद शिंदे, अनंत रसाळ, सज्जन जाधव,  आबा पवार आदींची उपस्थिती होती. 


 
Top