तेर / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे नवरात्र महोत्सव निमित्ताने बारावीच्या  विद्यार्थी, विद्यार्थीनीसाठी आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेत गोडसे,माने,ढोबळे विजेते ठरले.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे नवरात्र महोत्सव निमित्ताने नरहरी बडवे यांनी बारावीच्या विद्यार्थी, विद्यार्थीनीसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेत प्रथम विजेती शितल गोडसे , व्दितीय विजेती निकीता माने, तृतीय विजेती प्रांजली ढोबळे विजेते ठरले. स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र संत विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.के बेदरे  यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रा.दयानंद फंड,प्रा.एस.यू भालेराव,प्रा.एस.आर.पाटील,प्रा.एस.एस.सामते,प्रा.प्रशांत मेंढे, क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.परीक्षक म्हणून कलाशिक्षक नवनाथ पांचाळ यांनी काम पाहिले. 


 
Top