उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील सौ.साधना नंदकुमार मनाले यांना पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) चा मदतीचा हात !

सौ.साधना यांचे पती १९८९ पासून फोटो स्टुडिओचा व्यवसाय करतात. आपणही व्यवसाय सुरू करून ‘आत्मनिर्भर’ व्हावे व पतीला आर्थिक सहकार्य करावे अशी सौ.साधना यांची प्रबळ इच्छा होती. पैसे जमवून २०१७ मध्ये त्यांनी गारमेंटचा व्यवसाय सुरू केला. गेल्या काही वर्षांपासून त्या व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र म्हणावे तसे भांडवल उपलब्ध होत नव्हते.

काही दिवसांपूर्वी त्यांना  PMEGP योजनेबद्दल माहिती मिळाली. त्यांनी आपल्या कार्यालयाशी संपर्क साधला. कार्यालयाच्या मदतीने कर्जासाठी बँकेत फाईल टाकली आणि त्यांना ३,००,००० रुपयांचे कर्ज मंजूर झाले.

या पैशांतून त्या व्यवसाय वाढवणार आहेत. अंदाजे २०,००० ते २२,००० रुपयांचे मासिक उत्पन्न त्यांना अपेक्षित आहे. आपल्या व्यवसायातून इतर माता-भगिनींना देखील लाभ घ्यावा अशी त्यांची इच्छा आहे.

कोणताही नवीन व्यवसाय सुरू करायचा असो किंवा व्यवसायात वाढ करायची असो, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला स्वयंरोजगार प्राप्त करून देण्यासाठी आम्ही कायमच कटिबद्ध आहोत... ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी आपण एक पाऊल पुढे या... आपल्या मदतीसाठी आम्ही कायमच तत्पर आहोत...

 
Top