तुळजापूर / प्रतिनिधी-
तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह परिसरात गुरुवार दि. ६ रोजी सांयकाळी साडेसहा पासुन पाऊसास सुरुवात होऊन तो राञी पर्यत चालुच होता. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई कडुन प्राप्त झालेल्या हवामान अंदाजनुसार तुळजापूर तालुक्यात पुढील पाच दिवस आकाश ढगाळ,राहुन हलक्या ते मध्यम स्वरूपाची शक्यता असल्याने अश्विनी पोर्णिमा उत्सवावर,पावसाची सावट असणार आहे.
या पावसामुळे प्रशासन व व्यापारी वर्गाने अश्वीनी पोर्णिमा तयारीत व्यत्यय आणला आहै. यापुढे पाच दिवस पाऊस पडण्याचा अंदाज असल्याने पावसाचे संकट प्रशासना बरोबरच व्यापारी वर्गा समोर उभे टाकले असुन भाविकातही चिंतेचे वातावरण पसरलेआहे.
या झालेल्या पावसामुळे पंचक्रोषीत असलेल्या काढलेल्या सोयाबीनचे भिजुन नुकसान झाले तर सोयाबीन काढणी पावसामुळे रोखली गेली आहे. पाऊस सातत्याने पडत असल्याने शेतकरी वर्गाचे हातातोंडाशी आलेले सोयाबीन पिक हातचे जाण्याची शक्यता आहे.