उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्हा केंद्रावर शनिवार दि. 08 ऑक्टोबर, 2022 रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट ब संयुक्त पुर्व परीक्षा 2022 ही परीक्षा सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 या कालावधीत पुढील एकूण 21 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. एकूण 6 हजार 144 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.

 उपकेंद्र क्र. 01 श्रीपतराव भोसले ज्यु कॉलेज, तळ मजला, मेन रोड (240), उपकेंद्र क्र. 02 श्रीपतराव भोसले ज्यु कॉलेज, पहिला मजला, मेन रोड (264),  उपकेंद्र क्र. 03 श्रीपतराव भोसले ज्यु कॉलेज, दुसरा मजला, मेन रोड (432), उपकेंद्र क्र. 04 श्रीपतराव भोसले ज्यु कॉलेज, तिसरा मजला, मेन रोड (432), उपकेंद्र क्र. 05 श्रीपतराव भोसले ज्यु कॉलेज, ( आण्णा ई टेक्नो), नवीन इमारत, मेन रोड (336),  उपकेंद्र क्र. 06 रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, पहिला मजला, तांबरी विभाग, मेन रोड, पार्ट – B (384), उपकेंद्र क्र. 07 रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, नवीन इमारत, मेन रोड (240),  उपकेंद्र क्र. 08 छत्रपती शिवाजी हायस्कुल, तांबरी विभाग (384), उपकेंद्र क्र. 09 अभिनव इंग्लिश स्कुल, भानु नगर, बजाज शोरुमच्या पाठीमागे (288), उपकेंद्र क्र. 10 विद्यामाता हायस्कुल, सांजा चौक, औरंगाबाद बायपास रोड (240), उपकेंद्र क्र. 11 शासकीय तंत्रनिकेतन, तुळजापुर रोड (240),  उपकेंद्र क्र. 12 श्री श्री रविशंकर विद्यामंदीर, जाधववाडी रोड, हातलादेवी कॅम्पस, पार्ट – A (168), उपकेंद्र क्र. 13 श्री श्री रविशंकर विद्यामंदीर, जाधववाडी रोड, हातलादेवी कॅम्पस, पार्ट – B (312),  उपकेंद्र क्र. 14 तेरणा आर्ट, सायन्स व कॉमर्स कॉलेज, एमआयडीसी परिसर (216), उपकेंद्र क्र. 15 जि.प.कन्या प्रशाला, शहर पोलीस स्टेशनजवळ (264), उपकेंद्र क्र. 16 आर्य चाणक्य माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय, समर्थ नगर, सांजा रोड (240), उपकेंद्र क्र. 17 तेरणा पब्लिक स्कुल, बार्शी नाक्याजवळ, उंबरे कोटा (336), उपकेंद्र क्र. 18 पोदार इंटरनॅशनल स्कुल, आर. डी. नगर, विकास नगर समोर, सोलापुर बायपास रोड (240), उपकेंद्र क्र. 19 ग्रीनलॅन्ड हायस्कुल, तुळजापुर रोड (360), उपकेंद्र क्र. 20 शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, तुळजापुर रोड (288), उपकेंद्र क्र. 21 रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, तळ मजला, मेन रोड, तांबरी विभाग, उस्मानाबाद पार्ट – A (240) असे एकूण 6 हजार 144 परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत.  

   या परिक्षेसाठी आयोगाच्या वतीने सेवा पुरवठादार संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारांना परीक्षा उपकेद्रांच्या आवारात प्रवेश दिल्यानंतर गर्दीचे व्यवस्थापन आणि हॅण्डहेल्ड मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी तसेच झडती घेण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांना परीक्षेस प्रवेश देण्यापुर्वी त्यांची बुबुळाच्या आधारे तसेच चेहरा ओळख प्रणालीचा वापर करुन बायोमॅट्रिक उपस्थिती नोंदविण्यात येणार आहे. त्याचबरोबर परीक्षा उपकेंद्रावरील संपूर्ण कामकाजाचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे.

   या परीक्षेसाठी जिल्हयातील 21 उपकेंद्र परिसरामध्ये दि. 08 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 07.00 ते सायंकाळी 07.00 या कालावधीत कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील. त्याचप्रमाणे या उपकेंद्राच्या 100 मी. परिसरामधील झेरॉक्स सेंटर, पानपट्टी, टायपिंग सेंटर, एसटीडी बुथ, ध्वनीक्षेपक, कॉम्प्यूटर सेंटर्स, इंटरनेट कॅफे, आदी माध्यमे बंद राहतील. तसेच उपकेंद्रावर परीक्षार्थी नियुक्त अधिकारी किंवा कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांच्या व्यतीरीक्त इतर कोणासही (परीक्षार्थींचे नातेवाईक यांनाही) प्रवेश असणार नाही. या परीक्षा उपकेंद्र परिसरामध्ये मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ईमेल आणि इतर प्रसार माध्यमे घेऊन प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रवेश प्रमाणपत्र मिळण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाच्या contactsecretary@mpsc.gov.in आणि support.online@mpsc.gov.in या ई-मेल अथवा 1800-1234-275 किंवा ७३०३८२१८२२ या दूरध्वनी क्रमांकावरून विहित वेळेत आवश्यक मदत प्राप्त करून घेता येईल, असे जिल्हा केंद्र प्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी  शिवकुमार स्वामी यांनी कळविले आहे.

 
Top