तुळजापूर  / प्रतिनिधी-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे सुपुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांचे हस्ते जळकोट ( ता. तुळजापूर) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे उद्‌घाटन व लोकार्पण करण्यात आले .

  अध्यक्षस्थानी जळकोट गावचे सरपंच आशोक  पाटील तर जि . प . सदस्य प्रकाश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती . मनसे जिल्हाध्यक्ष   यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .      यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, जिल्हा संघटक अमरराजे कदम, उपजिल्हाध्यक्ष महेश जाधव यांचेसह जळकोट ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वीतेसाठी अजय डांबरे, सागर पवार, धनंजय मडोळे, आकाश पटणे यांनी परिश्रम घेतले.


 
Top