तुळजापूर  / प्रतिनिधी-

  येथील पोलिस स्टेशन पोलिस कर्मचाऱ्यांनी उत्तर प्रदेशतील कनोज जिल्हयातील दीड महिन्या पुर्वी हरवलेला १४ वर्षांच्या  मुलाला चार दिवस  सांभाळुन त्याच्या आईचा स्वाधीन करुन माणुसकीचे दर्शन घडवले. सध्या सर्वञ पोर चोरणारे समजुन अनेक प्ररप्रांतीयांना मारहाण होत असताना.  हा १४ वर्षाचा मुलगा माञ पोलिसांनी दाखवलेल्या सजगपणा व  माणुसकी मुळे वाचुन तो आईचा कुशात विसावला 

  उत्तर प्रदेश येथील कनोज जिल्हयतील गुडसाईगंज येथील १४  वर्षाचा कौसल पाल हा आई बरोबर बाबधाम येथे आला असता रेल्वे स्टेशनवर  चुकला व तो मुंबईच्याा रेल्वेत बसला तेथुन मुंबईला आला तेथुन रेल्वेने सोलापूरला आला मंगळवार रोजी आला तेथुन चालत गुरुवार दि.६तारखेला तुळजापूर तालुक्यातील तडवळा येथे संध्याकाळी आला तो पुलाखाली बसला  असता ग्रामस्थांनी पोर पळवणारा समजुन त्यास पकडुन ठेवले व पोलिसांचा ताब्यात दिले.

सदरील मुलास गुरुवारी राञी पोलिस ठाण्यात आणले असता पोलिस हवालदार गुरुनाथ लोखंडे व पोलिस हेडकाँस्टेबल विजुरथ भोसले यांनी त्यास धीर देवुन त्यास खाउ घालुन गोड बोलुन माहिती काढली व त्याच्या आईचा नंबर मिळवला आईला फोन लावुन पोराला बोलायला लावाताच आई अर्धातास रडुन बोलली व नंतर पोलिसांना म्हणाली काहीही करा पण माझा पोराला मी येईपर्यंत सांभाळा 

आई तातडीने कन्नोज हुन मुंबईला शनिवारी सकाळी आली व तेथुन सोलापूर हुन थेट तुळजापूरला येताच आई मुलगा एकमेकांना बिलगुन मनसोक्त रडली व पोलिसांनी सांभाळल्या बद्दल त्यांच्या  पाय पडुन आभार मानत असताना पोलिसांनी पाय पडुन न घेता चौकशी करुन पो.नि अदिनाथ काशीद यांच्या कडुन आईकडे सपूर्द केला.


 
Top