तेर / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे नवरात्र महोत्सव निमित्ताने दहावीच्या विद्यार्थीनींसाठी आयोजित शंभर मिटर धावणे स्पर्धेत रसाळ, पुजारी, पंडीत या विद्यार्थ्यीनी िवजेपद पटकाविले आहे. 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे नवरात्र महोत्सव निमित्ताने नरहरी बडवे यांनी दहावीच्या विद्यार्थीनींसाठी शंभर मिटर धावण्याची स्पर्धा आयोजित केली होती.या स्पर्धेत प्रथम विजेती अमृता रसाळ, व्दितीय विजेती ज्ञानेश्वरी पुजारी, तृतीय विजेती गायत्री पंडित विजेत्यां ठरल्या.स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र संत विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.के.बेदरे सर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी एस.एस.बळवंतराव   उपस्थित होते.परीक्षक म्हणून क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे यांनी काम पाहिले.


 
Top