उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभाग येथे आज दि 13 ऑक्टोबर 2022 रोजी राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीक्षीणता नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जागतिक दृष्टीदिनाचे आयोजन करण्यात आले होते.

 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड सर हे उपस्थित होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील,अति जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तानाजी लाकाळ, नेत्रशल्यचिकित्सक डॉ. भक्तवत्सल कठारे, डॉ.वीरभद्र कोटलवाड, डॉ.महेश पाटील, डॉ.मुस्तफा पल्ला, डॉ.श्वेता पवार, डॉ.पवन महाजन, अधिसेविका श्रीमती सुमित्रा गोरे, नेत्रचिकित्सा अधिकारी  घाडगे बाळासाहेव, रामराजे बिडवे, निलेश कुरील तसेच रुग्णालयातील विविध विभागाच्या वॉर्ड इन्चार्ज, नेत्रविभागाच्या वॉर्ड इन्चार्ज श्रीमती वहिदा शेख आणि नेत्रविभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

   या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात नेत्र शल्यचिकितसक डॉ.वीरभद्र कोटलवाड जागतिक दृष्टीदिनाचे महत्व सांगताना म्हणाले की, सामान्य जनतेमध्ये विविध नेत्र आजाराबाबत जनजागृती करणे हा उद्देश आहे. त्याअंतर्गत मोतिबिंदूमुळे आलेले अंधत्वाचे प्रमाण सर्वात जास्त आहे. त्याला शस्त्रक्रिया शिवाय पर्याय नाही. तसेच मधुमेहामुळे होणारे डोळ्याचे आजार, काचबिंदु, लहान मुले आणि जेष्ठ व्यक्ती मध्ये असणारे विविध नेत्रविकार  तसेच इतर नेत्रविषयक आजाराबाबत माहिती देऊन काळजी घेण्याबाबतचे महत्व विशद केले.  केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार “Love Your Eyes” “प्रेमाणे घेऊया आपल्या डोळ्याची काळजी व निगा” हा उद्देश समोर ठेवून जागतिक दृष्टी दिन संपूर्ण भारतात तसेच जगभर साजरा करण्यात येत आहे.

 दि.19 सप्टेंबर 2022 रोजी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालेले नितीन चंद्रकांत हुलसुरकर यांच्या नातेवाईकांनी त्यांचे मरणोत्तर नेत्रदान करुन दृष्टीदानाचे अमुल्य कार्य केले होते. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांच्या हस्ते त्यांच्या नातेवाईकांचा स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

  कार्यक्रमाच्या समारोप करताना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.संजय राठोड यांनी “असेल दृष्टी तर दिसेल सुंदर सृष्टी” अंतर्गत सांगताना मानवी अवयव आणि पंच ज्ञानेद्रिंयामधून डोळा हा अवयव किती महत्वाचा आहे आणि शासनामार्फत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून डोळ्याची तपासणी, उपचार व काळजी घेण्याबाबत मोहिम राबविली जात आहे. परंतु आपण वैयक्तिकरित्या देखील आपल्या डोळे आणि त्या आजाराबाबत जागरुक राहणे आवश्यक आहे. वेळोवळी आपण आपल्या डोळ्याची तपासणी करुन घेणे महत्वाचे आहे. जेणे करुन कोणत्याही कारणामुळे जर अंधत्व येणार असेल तर वेळीच तपासणी आणि उपचार करुन ते टाळता येऊ शकते.


 
Top