उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नगर रचना आणि मुल्य निर्धारण विभागाच्या या कार्यालयातील वर्ग-4 शिपाई या रिक्त पदाचे कामकाज बाह्ययंत्रणेद्वारे मान्यता प्राप्त संस्था, कंपनी यांच्याकडून कंत्राटी तत्वावर उमेदवाराची सेवा उपलब्ध करून घेण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे.

 त्यास अनुसरून मान्यताप्राप्त संस्था, कंपनी यांच्याकडून या कार्यालयास दोन उमेदवार वर्ग -4 शिपाई पदासाठी (किमान चौथी पास असणे आवश्यक आहे.) उमेदवाराची सेवा निव्वळ तात्पुरत्या कंत्राटी स्वरूपात 11 महिन्याच्या कालावधीसाठी उपलब्ध करून देण्यासाठी दरपत्रक मागविण्यात येत आहेत. दरपत्रके सिलबंद पाकीटात बातमी प्रसिध्द झाल्यापासून दि. 21 ऑक्टोंबर, 2022 रोजीचे सायंकाळी 05.00 वाजेपर्यंत या कार्यालयाकडे पोहचतील अशा बेताने पाठविण्यात यावेत, तसेच अटी आणि शर्ती या कार्यालयाच्या सूचना फलकावर पहावयास मिळतील. कार्यालयाचा पत्ता सहायक संचालक, नगर रचना, उस्मानाबाद शाखा कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळ मजला रूम. नं 04 उस्मानाबाद- 413501 आहे. असे संचालक, नगर रचना, कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


 
Top