उस्मानाबाद / प्रतिनिधी-  

निवडणुक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर  दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्हाचा वापर करता येणार नाही हे  स्पष्ट केले आहे. त्यानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी तीन सुचविलेल्या तीन चिन्हापैकी पेटती मशाल  हे चिन्ह शिवसेनेला मिळाले. त्यानंतर सोमवारी रात्री उस्मानाबाद शहरातील भवानी चौकात भव्य पेटती मशाल उभा करून उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत खा.ओमराजे निंबाळकर, अामदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी जल्लोष केला. 

   उद्धव ठाकरे गटाचे एकनिष्ठ आमदार कैलास पाटील यांच्या बाबतीत एक मोठा योगायोग समोर आला आहे. अामदार कैलास पाटील यांनी त्याच्या आमदार विकास निधीतून भवानी चौकाचे  सुशोभीकरण केले असून, या चौकात भव्य अशी मशाल बसवण्यात आली होती. या मशालीचे उद्घाटन अामदार कैलास पाटील यांनी  केले. अामदार पाटील यांनी  भव्य अशा मशालीचे उद्घाटन केले. आिण विशेष म्हणजे योगायोगाने उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल चिन्ह मिळाले. त्यामुळे आमदार,खासदार, माजी नगराध्यक्षासह शेकडो शिवसैनिकांनी भवानी चौकात जल्लोष साजरा केला. 

 
Top