तुळजापूर  /  प्रतिनिधी -

  श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवातील  दुर्गाष्टमी दिनी सकाळी  ११.30 वाजता वैदिक होमास प्रारंभ  झाला.  या यज्ञाचे यजमान म्हणून   जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डाँ सचिन ओंम्बासे   दाम्पत्यांच्या हस्ते  होम हवन करण्यात अाला.

 त्यानंतर ४ .४५ वाजता कोहळ्याची होम कुंडात पूर्णाहुती दिल्यानंतर या  होम विधीचा  सांगता झाली.या विधीचे पौराहित्य बडू पाठक यांच्या नेतृत्वाखाली शहरातील बृम्हवंदांनी केले .

 राञी मंदीर प्रांगणात छबिना काढण्यात आल्यानंतर प्रक्षाळपुजा देविचे महंत वाकोजी बुवा, गुरु तुकोजीबुवा यांनी केल्यानंतर आठव्या माळेच्या धार्मिक विधीचा सांगता झाली.

 

 
Top