उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शासन निर्देशानुसार, उस्मानाबाद जिल्हयातील उमरगा व लोहारा तालुक्यातील  “अ” व “ब” वर्गवारीच्या गावांतील भूकंपग्रस्त लाभार्थ्यांच्या घरांचे त्यांच्या वारसांच्या नावे हस्तांतरण करणे तसेच, भूकंपग्रस्त लाभार्थी मृत्यु पावल्यानंतर त्या लाभार्थ्यांच्या कायदेशिर वारसाच्या नावे वारसा हक्क नोंद मंजूर करणे याविषयीचे अधिकार दि. 29. सप्टेंबर 2022  च्या आदेशाव्दारे संबंधित ग्रामपंचायतीस प्रदान करण्यात आले आहेत.              

  तसेच अशा घरांचे इतर प्रकारे होणारे हस्तांतरण जसे वाटणीपत्र विक्रीखत, बक्षिसपत्र, दानपत्र व गहाणखत इत्यादी विषयक हस्तांतरणाचे अधिकार तहसीलदार, उमरगा व लोहारा जि.उस्मानाबाद यांना प्रदान करण्यात आले आहेत.  

  जिल्हाधिकारी, यांनी दि. 29. सप्टेंबर 2022 रोजी दिलेल्या आदेशान्वये,      दि. 01 ऑक्टोबर .2022 रोजी पूर्वीची अशा प्रकारे झालेली हस्तांतरणे नियमानुकूल करणे आवश्यक असल्यामुळे, उस्मानाबाद जिल्हयातील उमरगा व लोहारा तालुक्यातील “अ” व “ब” वर्गवारीच्या गावांतील   दि. 01 ऑक्टोबर 2022 पूर्वी विना परवाना झालेली हस्तांतरणे (फक्त नोंदणीकृत व्यवहार) संक्षिप्त चौकशी करून नियमानुकूल करण्याविषयीचे अधिकार, उपविभागीय अधिकारी-उमरगा, जि.उस्मानाबाद यांना प्रदान केलेले आहे. हा आदेश दिनांक 01 ऑक्टोबर 2022 पासून लागू राहतील. 


 
Top