उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सततच्या पावसाने धाराशिव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी झालेल्या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणुन राज्यातील शेतकऱ्यांना रु.७५५ कोटींचे अनुदान जाहीर करण्यात आले,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारने घेतलेल्या या अभूतपूर्व निर्णयाचे धाराशिव भाजपाच्या वतीने मा. आ.राणाजगजितसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या नेतृत्वात जल्लोष करून स्वागत करण्यात आले.

 या निर्णयाचे स्वागत करताना खंडेराव चौरे,रामदास कोळगे, नाना कदम, राजसिंहा राजेनिंबाळकर, राहूल काकडे,  प्रविण सिरसाठे, अमोल राजेनिंबाळकर, दत्ता पेठे,विनोद निंबाळकर, युवराज नळे, ओम नाईकवाडी ,शेषेराव उंबरे ,विनायक कुलकर्णी, रोहित दंडनाईक, बापू पवार , नामदेव नाईकल,लक्ष्मण माने ,दयानंद मुडके, राहूल  शिंदे, हिम्मत भोसले,अमित कदम , प्रसाद मुंडे,नरेन वाघमारे , गणेश मोरे,  गणेश इंगळगी, अमोल पेठे, सागर दंडनाईक आदीची उपस्थिती होती. 


 
Top