उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद वकील नागरी सहकारी पतसंस्था म उस्मानाबाद या संस्थेची 20 वी आधीमंडळाची सर्वसाधारण सभा दि 30 9 2022 रोजी दुपारी एक वाजता संस्थेचे चेअरमन अँड राजेंद्र शंकरराव धाराशिवकर यांच्या अध्यक्षतेखाली शिवानंद फंक्शन हॉल उस्मानाबाद येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडून व दीपप्रज्वलन संचालक अँड आर एस वटेअँड शशिकांत निंबाळकर अँड मिलिंद पाटील अँड अविनाश देशमुख तसेच बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड सुधाकर मुंडे यांच्या हस्ते ती पूर्ण करण्यात आले त्यानंतर सभेत आंबेडकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अँड  निलेश बारखेडे व सोयाबीन बी उद्योजक अँड अमोल रणदिवे यांचा शाल श्रीफळ देऊन यांचा सत्कार करण्यात आला

सभेचे प्रास्ताविक अध्यक्ष अँड राजेंद्र धाराशिवकर यांनी करताना सभेचे भाग भांडवल 2324000/- तसेच ठेवी तर 97600000/- अहवाल सालात कर्जवाटप  7111891/- इतकी आहे हे सांगितले संस्थेत अहवाल सालात उत्पन्न 7831986 /-रुपये उत्पन्न होऊन खर्च वजा जाता 1043204/- इतका निवडणुका झालेला आहे तसेच संस्थेस अ वर्ग दर्जा मिळाला आहे सभेत अँड मिलिंद पाटील अँड राम गरड अँड सुधाकर मुंडे यांनी मार्गदर्शन केले यावेळी मोठ्या संख्येने सभासद व कर्मचारी वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचा समारोप ऍड पांडुरंग लोमटे यांच्या पसायदानाने झाला

 
Top