तुळजापूर / प्रतिनिधी-

नवरात्र उत्सव अनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि- श्री. यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ- जावेद काझी, सुभाष चौरे, पोना- अशोक ढगारे, शैला टेळे, बलदेव ठाकुर यांचे पथक आज दि. 30.09.2022 रोजी तुळजापूर शहरात गस्तीस होते. दरम्यान पथकास श्री तुळजाभवानी मंदीर महाद्वारासमोर दोन भिक्षेकरी महिला येणाऱ्या- जाणाऱ्या भाविक लोकांकडून भिक मागत असल्याचे निदर्शनास आले. यावर पथकाने त्या दोन्ही महिलेस नाव- गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे- उज्ज्वला तेल्या पवार, (वय 45 वर्षे, रा. मूर्तिजापूर, ता. जि. अकोला  ) व सुजाता सुरेश कोळी, ( वय 25 वर्षे, रा. नळदुर्ग ) असे सांगीतले. यावर पथकातील महिला पोलीस- शैला टेळे यांनी त्या दोन्ही भिक्षेकरी महिलेंस ताब्यात घेउन त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियम 1959 कलम- 5 अंतर्गत तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 347, 348/2022 हे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्था.गु.शा. चे पोनि- यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ- जावेद काझी, सुभाष चौरे, पोना- अशोक ढगारे, शैला टेळे, पोकॉ- बलदेव ठाकुर यांच्या पथकाने केली आहे.     


 
Top