तुळजापूर  /प्रतिनिधी-

 रायसिना फाउंडेशन भारत व गोरसेना गोरसिकवाडीच्या वतीने जळकोट येथील कुलस्वामिनी आश्रम शाळेत परिसरातील दहावी, बारावीतील शंभर गुणवंत विद्यार्थ्यांचा  व सेवानिवृत्ती झालेल्याचा सत्कार करण्यात आला.

भविष्यात विद्यार्थ्यांना चालना मिळावी यासाठी मार्गदर्शन व प्रेरणा मिळावी म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी गोरसिकवाडीचे प्रदेश प्रमुख एल.टी.चव्हाण, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड, जिल्हा संयोजक शिवाजी राठोड,गोरसेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव, सरपंच ज्योतीका चव्हाण, अमृता चव्हाण, लक्ष्मण राठोड, डॉ.वाय के. चव्हाण, सरपंच बालाजी राठोड, दामाजी राठोड,नगर अभियंता प्रशांत चव्हाण, वसंत पवार, गौतम राठोड, बाबुराव चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विनायक चव्हाण, पोलीस पाटील शिवाजी चव्हाण आदिजण उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोरसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष लखण चव्हाण, सरचिटणीस कुमार राठोड, तालुकाध्यक्ष राजु चव्हाण, दिनेश राठोड व कुलस्वामिनी आश्रम शाळेतील शिक्षक यांनी परिश्रम घेतले.


 
Top