तुळजापूर/ प्रतिनिधी-
श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सव पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मंदीर विद्युत रोषणाई व छबिना वाहन अर्पण सोहळा शुक्रवार दि .२३रोजी सांयकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
श्री तुळजाभवानी राजेशहाजी महाध्दार राजमाता माँ जिजाऊ तसेच मंदीर परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाई पुणे येथील देविभक्त विजय उंडाळे, नितीन उंडाळे तसेच संजय टोळगे, सोमनाथ टोळगे, गौरव टोळगे, सौरव परिवाराने सलग आठव्या वर्षी विद्युत रोषणाई केली. तसेच श्री तुळजाभवानी मातेच्या छबिना काढण्यासाठी चांदीचे आवरण असलेले नंदी, मोर, गरुड हे देविजींचा छबिना काढण्यासाठी लागणारे वाहने आज देविचरणी अर्पण केले.
यावेळी श्रीतुळजाभवानी मंदीराच्या प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार योगिता कोल्हे, प्रशांत थोपटे, राजाभाउ कदम, विश्वास परमेश्वर यांच्या उपस्थितीत अर्पण करण्यात आले. छबिनासाठी लागणारे नंदी, गरुड, मोर हे चांदीचे आवरण असणारे वाहने गदादे (पाटील)खोजे परिवार टोळगे परिवार,यांनी दिले. या अर्पण सोहळ्याच्यावेळी भाविक वर्ग मोठ्या संखेने उपस्थितीत होता.