उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 PFRDA यांच्याकडून राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेतील सभासदांकरिता वेबिनारच्या माध्यमातून दर आठवडयाला ऑनलाईन प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. या प्रशिक्षणास इच्छूक सभासदांना सहभाग घेण्यासाठी (https://www.pfrda.org.in/index1.cshtml?lsid=546)  या  PFRDA  यांच्या  वेबसाईटवर  Flash Messages मध्ये are you a subscriber interested in undergoing online training on NPS (including Central Government, State Government, Autonomous Bodies Subscribers) ही वेब लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

सभासदाने या वेब लिंकवर क्लिक केल्यावर आवश्यक माहिती (उदा. सभासदाचा प्रान क्रमांक, मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, शहर, पिनकोड इ.) भरून Submit करावे. PFRDA द्वारे संबंधित सभासदांना त्यांच्या प्रशिक्षणाचा दिनांक आणि वेळ ई-मेलद्वारे, मोबाईलवर SMS द्वारे कळविण्यात येईल. तरी या प्रशिक्षणात सर्व राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या सभासदांनी (NPS) सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी सचिन इगे यांनी केले आहे.


 
Top