उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 नवी दिल्ली येथील भारत सरकार,युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय यांनी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, खेळामध्ये यश संपादन केल्याबद्दल ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी(विद्यापीठांकरिता) द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन ॲवार्ड, 2022 करीता  पुरस्कारासाठी नामनिर्देशनाचा प्रस्ताव दि. 20 सप्टेंबर, 2022 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत केंद्र शासनास सादर करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

 विहित कालावधीनंतर प्राप्त होणरे अर्ज अथवा अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे नमुद केलेले आहे. तसेच यावर्षीपासून पात्र खेळाडूंनी पुरस्काराकरिताच्या मार्गदर्शक तत्वानूसार (Award Guidelines) अर्जदारांनी स्वत: फक्त ऑनलाईन पोर्टलद्वारे आपले विहीत नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची अथवा व्यक्तीची शिफारस न घेता थेट केंद्रशासनास dbtyas-sports.gov.in या पोर्टलवर/वेबसाईटवर सादर करण्याबाबत सूचित केले आहे.

  तसेच ऑनलाईन अर्जाबाबत काही अडचण असल्यास Department of Sports At section.sp4-moyas@gov.in किंवा 011-23387432 या संपर्क क्रमांकावर कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत सकाळी 9.00 ते सायं.5.30 पर्यंत संपर्क करता येईल. तसेच केंद्रसनाच्या विविध पुरस्काराची सविस्तर माहिती, नियमावली आणि विहित नमुना अर्ज https://yas.nic/in/sports या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

 तरी उस्मानाबाद जिल्हयातील पात्रताधारकांनी जास्तीत जास्त या पुरस्काराचे अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे

 
Top