उस्मानाबाद /प्रतिनिधी - 

रमाई आवास घरकुल योजना आपल्या विभागाकडुन नगरपरिषद अंतर्गत साधारणतः 2700 ते 2800 घरकुलांना मान्यता मिळाली आहे,परंतु निधी अभावी बरेच घरकुलाची कामे अर्धवट अवस्थेत आहेत त्यामुळे नागरिकांचे प्रचंड गैरसोय होत आहे सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे नागरिकांना उघड्यावर राहावे लागत आहे तसेच घरकुल आवास योजनेत (शहरी) दोन लाख 50 हजार रुपये अनुदान मिळते परंतु सध्याच्या महागाईनुसार स्टील,सिमेंट,वाळू,वीट आणि मजुरीचे दर हे पूर्वीच्या दरापेक्षा दुप्पट प्रमाणात वाढले असुन सदर रक्कम  तुटपुंजी आहे व या रकमेमध्ये घर होणे शक्य नाही तरी आपण रमाई आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या अनुदानात दोन लाख 50 हजार रुपये ऐवजी पाच लाख रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी समाज कल्याण आयुक्त डॉ प्रशांत नारनवरे हे उस्मानाबाद दौ-यावर आले असता समक्ष चर्चा करुन दिली,यावरती प्रशांत नारनवरे यांनी सदर मागणी रास्त असुन वाढीव निधीची तरतुद करु असा शब्द दिला. निवेदन देतांना  नगरसेवक सिद्धार्थ दादा बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली सर्व समाज बांधवांच्या वतीने देण्यात आले.निवेदन देतांना नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे,ओबीसी काॅग्रेस जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत,काॅग्रेस शहर सरचिटणीस संजय गजधने, सामाजिक कार्यकर्ते राहुल बनसोडे,सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे,सचिन धाकतोडे,प्रदीप तात्या माळाळे,आनंद बनसोडे अन्य इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top