परंडा / प्रतिनिधी-

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त तालुक्यातील पवारनगर आयोजित तालुकास्तरीय लंगडी स्पर्धेत भोसलेवस्ती शाळेच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

      सर्व खेळाडू मुलींची जिद्द,चिकाटी,जिगरबाज संघभावना, प्रचंड उत्साह आणि संघ व्यवस्थापक यांची रणनिती यांचे समन्वयातून पहिल्या सामन्या पासूनच प्रतिस्पर्धी संघावर मजबूत पकड घेत दबदबा निर्माण केला.एका डावात  प्रतिस्पर्धी संघाचे २५ खेळाडू बाद करण्याचा विक्रम ही भोसलेवस्ती शाळेच्या मुलींच्या संघाने रचला,संघ व्यवस्थापक वैजिनाथ सावंत यांचे चकली या प्रेरक शब्दाने सारा परिसर दणाणून सोडला नि खेळाडू मुलींनी देखील  चकली या रणनितीचा पूरेपूर वापर करत प्रतिस्पर्धी संघाची‌ विजयाची संधी कोसो दूर ठेवली.

खेळ कसा करावा याचा आदर्श नमुनाच पवारनगरच्या मातीला सर्व प्रेक्षकांच्या -हदयाला भिडवला.संघ व्यवस्थापक यांचे व सर्व खेळाडू मुलींचे उपस्थित सर्वांनी मनोमन कौतुक केले.

प्रथम क्रमांक ट्रॉफी,३५०१/ रोख रक्कम व सर्व खेळाडूंना प्रमाणपत्रे असे बक्षीस जिंकत उपस्थित सर्वांची मने जिंकली.

यावेळी आनाळा बीट विस्तार अधिकारी योगेंद्र खराडे, केंद्रीय मुख्याध्यापक सुर्यकांत साळुंके, प्रदिप टाक, विनोद सुरवसे,पवारनगर शाळा व्य.समिती अध्यक्ष सातपुते, भोसलेवस्ती शाळेचे मुख्याध्यापक तथा संघ व्यवस्थापक वैजिनाथ सावंत, शेळगावचे मुख्याध्यापक रघुनाथ दैन,आदिकराव कदम, प्रतिष्ठित नागरिक बापूराव(आबा) गायकवाड,माजी पंचायत समिती सदस्य दिपक गायकवाड, लक्ष्मण काळे,विजय जरांडे, शिक्षिका ज्योती देशमुख, मनिषा कुलकर्णी, सुरेखा भोसले,मनोरमा जाधव,माळीवस्तीचे मुख्याध्यापक दशरथ शेळके, खानापूरचे मुख्याध्यापक बाळासाहेब हजारे,रूईचे मुख्याध्यापक महादेव राऊत, शिक्षिका शिवकांता कांबळे,संगीता शिंदे, अर्चना कोकाटे,धनराज बनसोडे, कल्याण तांबे,अमित येळवे, सिद्धेश्वर मेदने, किशोर नरसिंगे,आनंद गायकवाड,तानाजी तरंगे, बाळासाहेब घोगरे, बळीराम भाडवलकर,श्याम कुलकर्णी, आप्पाराव तांदळे, पांडुरंग साबळे संतोष चव्हाण तसेच इनगोदा व पवारनगर येथील सर्व ग्रामस्थ यांनी भोसलेवस्तीच्या खेळाडू मुलींचे कौतुक करून अभिनंदन केले.


 
Top