उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात प्रसिद्धी विभागाच्या वतीने 2022 -23 या शैक्षणिक वर्षात युट्युब चॅनेल व प्रसिद्धी विभागाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख हे लाभले होते.

    यावेळी प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख यांनी प्रसिद्धी विभागाचे कौतुक करून प्रसार माध्यमे सध्याच्या काळात महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे दिसते. यामुळेच लोकशाहीला बळकटी मिळते. लोकशाहीचा चौथा खांब म्हणून प्रसार माध्यमे महत्वपुर्ण काम करतात. प्रसार माध्यमे ही समाजाचा आरसा असतात.  सर्व प्रकारच्या घटनांवर ते नजर ठेवून असल्याने हे लोकशाहीच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण काम आहे असे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी प्रतिपादन केले.

    कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रसिद्धी विभागाचे प्रमुख डॉ.मारुती अभिमान लोंढे यांनी केले .यावेळी डॉ.लोंढे म्हणाले की, महाविद्यालयात प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्धी विभाग काम करत असून त्यांच्या नवप्रवर्तनशील दृष्टीमुळेच प्रिंट मीडिया बरोबरच महाविद्यालयात यूट्यूब चैनल, फेसबुक पेज, ट्विटर सुरू करण्यात आले आहे.

 प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख पुढे म्हणाले की, प्रिंट मीडियाची भूमिका ही अनन्यसाधारण आहे. तरीदेखील त्यांच्या जोडीला इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया यांचेही महत्त्व वाढताना दिसत आहे. ही सर्व प्रकारची प्रसारमाध्यमे लोकशाही बळकट करण्याचे काम करतात.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैभव आगळे यांनी केले तर आभार प्रा. मोहन राठोड यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि प्रचंड संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.   सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

 
Top