उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील सांजा रोडचे नामांतर करण्यात येऊ नये असा ठराव सांजा ग्रामपंचायतने घेतला आहे. उस्मानाबाद नगर परिषदेच्या विरोधात आज (दि.19) आंदोलन करुन नगर परिषदेचे मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांना निवेदन निवेदन देण्यात आले.

 उस्मानाबाद नगर परिषदेच्या वतीने सांजारोडचे क्रांतिवीर दत्तोबा भोसले मार्ग असे नाव देण्याच्या हालचाली सुरू आहेत. या रस्त्याचे नाव बदलल्यास सांजा गावचे अस्तित्व संपुष्टात येत असल्याचा दावा ग्रामपंचायतच्या ठरावाद्वारे करण्यात आला आहे. 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी ग्रामसभेत सांजा रोडचे क्रांतिवीर दत्तोबा भोसले मार्ग नामकरणास विरोध करणारा ठराव ठराव मंजूर करण्यात आला.  गफूर मोहिद्दीन शेख यांनी हा ठराव मांडला होता. त्यास सतीश लक्ष्मण सूर्यवंशी यांनी अनुमोदन दिले होते.

 त्यानंतर सोमवारी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री.येलगट्टे यांना निवेदन देऊन नगर परिषदेच्या निर्णयाला विरोध दर्शविण्यात आला. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top