उस्मानाबाद  / प्रतिनिधी-

उस्मानाबाद - पुणे - पिंपरी चिंचवड चाफेकर चौकातील वक्रतुंड सभागृहात आखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र मराठी साहित्य मंडळ आयोजित पदाधिकारी मेळाव्यात उस्मानाबाद जिल्हा शाखेच्या जिल्हाध्यक्षपदी संदीप जगताप तर चिटणीसपदी कवी दिपक केंगार , यांची घोषणा मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर यांनी प्रदेशध्याक्ष सिध्देश्वर कोळी यांच्या शिफारसीने करण्यात आली.

 तसेच जिल्हाकार्याध्यक्षपदी कलाध्यापक शेषनाथ वाघ , उसाना बाद शहरसचिवपदी साहित्यिक मीना महामुनी, जिल्हाकार्यकारिणी सदस्य सुर्यकांत पाटील, श्यामसुंदर भन्साळी, कमालाकर पाटील , निखील गोरे यांची निवड करण्यात आली. पदाधिकारी मेळाव्यात उपस्थिती राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयप्रकाश घुमटकर , राष्ट्रीय उपाध्यक्षा कवियत्री ललिता गवांदे नाशिक, प्रदेशध्याक्ष सिध्देश्वर कोळी , प्रदेश कार्याध्यक्ष लेखक विनायक जाधव कराड, प्रदेश कार्यकारिणी सदस्या कवयित्री मधुरा कर्वे उस्मानाबाद ,विदर्भ विभाग प्रमुख कवी सिद्धार्थ कुलकर्णी नागपूर , जेष्ठ कादंबरीकार पत्रकार दशरथ यादव सासवड पुणे , प्राचार्य डॉ .एस.बी. पाटील वडूज सातारा, पुणे शहराध्यक्षा नीता बोडके, आयोजिका स्वागताध्यक्षा कवियत्री जयश्री श्रीखंडे यांच्या उपस्थितीत हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. त्याच बरोबर मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय लेखक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या मेळाव्यासाठी राज्यभरातून पदाधिकारी उपस्थित होते .


 
Top