तुळजापूर / प्रतिनिधी-

श्रीतुळजाभवानीच्या शारदीय नवराञ उत्सवात येणाऱ्या सर्वसामान्य भाविकांना तासोनतास रांगेत थांबुन मंदीरात  आले की, व्हीआयपी  दर्शन अडथळा ठरुन दर्शन घडत नसल्याने व्हीआयपी दर्शन व्यवस्थे  बाबतीत भाविकांनमधुन तीव्र नाराजी व्यक्त होत असुन  व्हीआयपी भाविकांना  सर्वसामान्य भाविकांन प्रमाणे दर्शन रांगेतुन दर्शन देवुन व्हीआयपी  भाविकांना आवरा अशी मागणी  संतप्त होवुन दर्शन पासुन वंचित राहिलेल्या  भाविक वर्गातुन होत आहे. 

  या काळात रांगेत थांबलेल्या एका भाविकाला चक्कर आल्याने त्यास मंदीरातुन स्ट्रेचर नेवुन उपचार करावे लागले एखादी अशीच दुर्घटना घडुन भाविकाचा जीवाला धोका झाला तर कुणाला जबाबदार धरायाचे असा प्रश्न निर्माण होतो 

व्हीआयपी च्या संख्येमुळे प्रशासन हतबल झाले असुन व्हीआयपींना  दर्शन द्यायचे  की सर्वसामान्यांचे दर्शन द्यायचे असा प्रश्न त्याला पडला आहे. एकदंरीत नवराञोत्सवात व्हीआयपी सर्वसामान्य असा भेदभाव प्रशासनाने दर्शन घडवताना करु नये , अशी मागणी संतप्त भाविकांन मधून केली जात आहे.

 
Top