तुळजापूर / प्रतिनिधी-

श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवात तुळजापुरात ललित पंचमी दिनापासुन कुमारीकांचे पुजन करुन दक्षणा देवुन भोजन देवुन कुमारी का रुपात स्ञी शक्तिचा  सन्मान  करण्याची परंपरा आजही पाळली जाते त्याचा प्रारंभ गुरुवार दि .२९पासुन  झाला आहे. 

 यात प्रथम नऊ, सात, पाच कुमारीकांचे पुजन केले जाते. नंतर दक्षणा देवुन पुरणपोळीचे भोजन देवुन सहकुंटुंब कुमारीका चरणी नतमस्तक होवुन पाया पडुन तिचा सन्मान केला जातो ही  परंपरा अनादी कालापासुनती आज बावीसव्या शतकात पाळली जात आहे. 


 
Top