उस्मानाबाद /प्रतिनिधी : नवरात्रौत्सवानिमित्त लेडिज क्‍लबतर्फे दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. क्‍लबच्या अध्यक्ष सौ. अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सौ. पाटील म्हणाल्या, की सलग दोन वर्षे कोरोनामुळे तर त्यापूर्वी एक वर्ष अगोदर राज्यातील पूर स्थितीमुळे दांडिया महोत्सव झाला नव्हता. यंदा कोरोनाचे संकट नसल्यामुळे नवरात्रौत्सव धडाक्यात सुरु आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शहरातील लेडिज क्‍लबच्या मैदानात हा महोत्सव आयोजिला आहे. 1 ते 3 ऑक्टोबर असे तीन दिवस हा कार्यक्रम होईल. यात सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक, समृध्दी केळकर, रुपाली भोसले, प्राजक्‍ता गायकवाड या अभिनेत्री उपस्थित राहणार आहेत. येथे सवार्र्ंना मोफत प्रवेश असून नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सौ. पाटील यांनी केले. या वेळे नंदा पुनगुडे, माधुरी गरड, धनश्री ताड आदी उपस्थित होते.

---

नवदुर्गांच्या हस्ते पूजन

दरम्यान, तुळजापूर येथे तुळजाभवानी मंदिरात देवीची आरती नवदुर्गांच्या हस्ते होत आहे. यासाठी अमृता फडणवीस, कमानी ग्रुपच्या कल्पना सरोज, भाजप सरचिटणीस विजया रहाटकर, सोलापूरच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, खा. नवनीत राणा, वीणा पाटील, डॉ. स्वाती मुजुमदार, राष्ट्रपतींच्या खासगी सचिव संपदा मेहता आदींना निमंत्रण दिले आहे, अशी माहिती सौ. पाटील यांनी दिली.

----------

 
Top