परंडा / प्रतिनिधी - 

शहरातील हंसराज गणेश मंडळाच्या वतीने शनिवार दि.३ रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले यावेळी मल्लिकार्जुन रक्तपेढी सोलापूर यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले यावेळी ७१रक्तदात्यानी आपले रक्तदान केले. 

रक्तदान शिबिराचे उद्घाटन येथील डॉक्टर वि.पा.करळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी डॉ.परंडा असोशिएन चे डॉ.देवदत्त कुलकर्णी, डॉ.संजय वाळके, डॉ.मंदार पंडित,डॉ.स्मिता पाटील मॅडम, डॉ.प्रशांत गोफने, डॉ.नलवडे, पॅथालॉजीचे डॉ.शहाजी नलवडे, डॉ.राजेंद्र रेवडकर, डॉ.काळे, राजेश ठक्कर व मंडळाचे मार्गदर्शक नितीन भोत्रेकर, प्रमोद वेदपाठक, मा.नगरसेवक मकरंद जोशी, ॲड.श्रीकांत भालेराव ,जयंत भातलवंडे, रोहित मुंगळीकर, राहुल देवळे तसेच मल्लिकार्जुन ब्लड बँकेचे अध्यक्ष बी.एस. जमादार, संचालक सकिब जमादार व कर्मचारी उपस्थित होते. 

     या कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष अमित जोशी, उपाध्यक्ष शुभम भातलवंडे, खजिनदार समर्थ कुळधर्मे, सचिव अहमद मुजावर, सहसचीव अमोल भराटे, संदीप महामुनी,गणेश पवार, शांतनू  भातलवंडे, सुमित भातलवंडे, भगवान शहाणे यांनी रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

 
Top