उस्मानाबाद / प्रतिनिधी-

खासदार  ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील आणि सामाजिक दृष्टिकोण बाळगणारे डॉ. जयप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पवनराजे फाउंडेशनच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील कोंड येथे घेण्यात आलेल्या शिधापत्रिका दुरुस्ती व ई-श्रम कार्ड शिबिरातील सर्व प्रकरणे मोफत तयार करून  वाटप करण्यात आले.

या शिबिराचा गावातील व परिसरातील असंख्य नागरिकांनी लाभ घेतला. सर्व सामन्यांच्या अडचणी व अव्हेलना लक्षात घेता खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांनी या मोहिमेस सुरुवात करण्याचे वचन हाती घेतले आहे व सर्व प्रकरणे मोफत करुन देण्याचे ठरवले आहे भविष्यात आणखी अशीच शासकीय कामे हाती घेतली जाणार आहेत. याची माहिती ही मोहीम यशस्वीपणे राबवीणारे फाउंडेशन चे अध्यक्ष श्री. उदयप्रकाश बाळासाहेब माकोडे व सचिव श्री. प्रीतम प्रताप नाडे यांनी दिली.

याप्रसंगी रमेश पाटील,   मिलन भोसले,   लक्म्मन गायकवाड,  अजित पाटील,  अमोल भोसले,  गोवर्धन भोसले, बंडू शिंदे तसेच नागरिक, पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top