तुळजापूर / प्रतिनिधी-

  महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञोत्सवा पुर्वीच्या नऊ दिवसाच्या  मंचकी निद्रेस   शनिवारी ( दि . १७ ) राञी पासुन  प्रारंभ झाला आहे.

  श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सव पुर्वीचा मंचकीनिद्रा तयारीस  शनिवारी सकाळी सुवासनींनी एकमेकींना हळदी-कुंकु लावुन  प्रथमता देवीजींच्या गादीचा कापुस वेचुन काढला.  यावेळी आराधी मंडळींनी आरादी गीत गायले नंतर हा कापुस मुस्लीम धर्मिय  शेख पिंजारी कुंटुबांनी पिंजुन दिल्यानंतर निकते कुलकर्णी  कुंटुंबियांनी तो नवीन कपड्याने तयार केलेल्या तीन गाद्यांन मध्ये भरला.

इकडे देविजींचे शेजघर, पलंग खोली, पलंगे कुंटुंबियांनी स्वच्छ  केल्यानंतर चांदीच्या पलंगावर प्रथमता नवारपट्या  बांधण्यात आल्या त्यावर तीन गाद्या  व लोड ठेवून पलंगपोस टाकुन बाजुला मखमली पडदे लावण्यात आले.पाच वाजता देविजीचे शेजघर पलंगे कुंटुंबियांनी तयार केले.

साडेसहा वाजल्या नंतर देविजींना भाविकांचे दही,दुध, पंचामृत अभिषेक संपन्न झाल्यानंतर देविजींची मुळमुर्ती स्वच्छ करण्यात आली. नंतर वाघे कुंटुंबियांनी दिलेली हळद (भंडारा ) देविजींना लावण्यात आला.  देविजींची मुळमुख्य मुर्ती भोपे पुजारी वृदांनी हातावर अलगद उचलुन ती शेजघरात आणुन चांदीचा पलंगावर निद्रस्त करण्यात आली. यावेळी धुपारती करण्यात आली नंतर प्रक्षाळपुजा  होवुन देविजींचा शारदीय नवराञ उत्सव पुर्वीचा नऊ दिवसाचा मंचकीनिद्रेस प्रारंभ झाला आहे. यावेळी देविजींचे मंहत भोपे  पुजारी, सेवेकरी,  मंदीर विश्वस्त, प्रशासकीय अधिकारी , कर्मचारी उपस्थितीत होते.

 सोमवारी होणार नवराञोत्सवास प्रारंभ

  देविंजींची निद्रस्त मुर्ती  सोमवार दि.२६रोजी पहाटे   देविजीचा सिंहासनावर प्रतिष्ठापना केल्यानंतर दुपारी बारा वाजता सिंह गाभाऱ्यात घटस्थापना करण्यात येवुन देविंजींच्या शारदीय नवराञउ त्सवास प्रारंभ होणार आहे. 


 
Top