उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुक्यातील काटीसह परिसरात मागील तीस वर्षांपासून अविरत रुग्णसेवा देणारे सुप्रसिद्ध डॉ.युसुफ मुजावर यांचे गुरुवार दि.1 रोजी पहाटे दिड वाजनेच्या सुमारास सोलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान दु:खद निधन झाले.   

  त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी 3:30  वाजता काटी येथील बसस्थानक शेजारील मुस्लिम स्मशानभूमीत काटीसह सावरगाव, वडगाव (काटी),सारोळा,वाणेवाडी आदी पंचक्रोशीतील लोकांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला.          त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

 
Top