उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 कळंब तालुक्यातील दहिफळ येथील नवतरूण गणेश मंडळाच्या एक गाव एक गणपतीची आरती माजी जिप.उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. 49 वर्षाची एक गाव एक गणपती परंपरा कायम ठेवली असुन सांस्कृतिक वारसा जपलेला आहे. कळंब तालुक्यातील एकमेव गाव एक गाव एक गणपती परंपरा जपणारे दहिफळ गाव आहे. विविध कार्यक्रमाचे आयोजन गणेश मंडळ करत असते.

दहिफळ येथे गणेश मंडळाच्या विनंतीवरुन संजय पाटील दुधगावकर यांनी दहिफळ येथे येऊन गणपतीची आरती केली. तसेच नवतरूण मंडळाचे कौतुक केले. यावेळी तात्या भातलवंडे, दत्तात्रय भातलवंडे, खंडु कुठे, कृष्णा पाटील, इस्माईल शेख, फुलचंद काकडे, ज्ञानेश्वर मते, मनिष गोरे, योगराज पांचाळ, सज्जन कोठावळे, आदित्य भातलवंडे, हर्षद मते, दत्तात्रय कागदे, रंजित काकडे, गणेश मते, सत्यम मते, सुरज भातलवंडे, जगदिश मते, शुभम मते, अमर मते आदी गणेश भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top