विशेष सरकारी वकील नियुक्त करून खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी केली आहे, अशी माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी  दिली आहे.

  घटनेचं गांभीर्य लक्षात घेतां पोलीस अधीक्षक यांना विशेष सरकारी वकील नियुक्तीचा प्रस्ताव राज्य सरकार कडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विशेष सरकारी वकील नियुक्त करून खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात घेण्याची कारवाई देखील करण्यात येणार आहे. गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नराधमाला विशेष सरकारी वकीलांकडुन फाशी ची शिक्षा मागण्यात येईल, असे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील सांगितले आहे. 

  आक्रमक जमावकडून आंदोलन

 सिंदफळ येथील पिडित मुलीला न्याय मिळावा, शासनाने कुटुंबाची पूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे, जोपर्यंत त्या मुलीला व कुटुंबीयांना न्याय मिळत नाही तोपर्यंत माळुंब्रा गाव स्वस्थ बसणार नाही. या मागणीसाठी ‌ तुळजापूर तालुक्यातील महिला व पुरुषांनी हजारोंच्या संख्येने एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून या पिडीतेला न्याय देण्याची मागणी केली.

अप्पर पाेलिस अधिक्षक नवनीत कॉवत, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना विविध मागण्याचे निवेदन सादर करीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात २ तास ठिय्या आंदोलन केले. जमाव आक्रमक होत असल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ आनंद नगर पोलीस ठाणे व दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले.   यावेळी सिदफळ गावचे सरपंच अर्जुन कापसे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, रिपाइंचे नाना शितोळे, रफीक शेख, सज्जन साळुंके, कादर खान, खलिफा कुरेशी, संजय साळुंके यांच्यासह सकल मुस्लिम व मराठा समाजातील महिला हजारोंच्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.  

तसेच  अल्पसंख्यक विकास मंडळाच्या वतीने   जिल्हा अध्यक्ष शेख जफर रब्बानी  यांनी आराेपीस फासीची शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन देण्यात आले.  त्याचप्रमाणे एमआयएम ने ही फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

 
Top