उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळ मानाचा गणपती श्री ची पूजा विधि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उस्मानाबाद जिल्ह्यातील लष्करातील जवान श्री जाधव व केंद्रीय राखीव पोलीस दल जवान श्री मगदूम शिवप्रसाद, उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय नामवंत, गुणवंत , साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक व कवी इत्यादींचा हस्ते पूजा विधि व संबंधिताचा सन्मान मंडळाने केला.  श्री ची पूजा विधि संपन्न झाल्यानंतर सध्या लष्करात कार्यरत असलेले श्री जाधव जवानाचा ,सीआरपी मध्ये पीएसआय म्हणून नुकतीच निवड झालेले शिवप्रसाद मुकदम, ज्येष्ठ साहित्यिक व कवी मधुकर हुजरे, आदर्श शिक्षक पुरस्कार, मिळालेले बालसाहित्यिक, राज्य पाठ्यपुस्तक मंडळावर सदस्य म्हणून असणारे ,समाधान शिकेतोड ,पंचायत समिती अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले आदर्श कर्मचारी रामलिंग काळे ,सहशिक्षक कलागुणांच्या वाढीसाठी आपल्या स्वतःच्या साहित्यामधून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी झटणारे श्याम नवले, प्राध्यापक अरविंद हंगरगेकर कवी विविध दैनिकात कविता प्रसिद्ध झालेले साध कालजाची काळजाला कवितासंग्रह प्रसिद्ध असलेले यांचा सन्मान, गेली वीस वर्षापासून पोहण ही कला शिकविण्यासाठी सतत कार्यरत असणारे व शहरातील मुला-मुलींना मोफत पोहणे शिकविणारे कैलास पानसे, भारतीय पारंपारिक असणाऱ्या खेळास जोपासण्यासाठी व वाढविण्यासाठी लगोरी सारख्या या खेळास राष्ट्रीय स्पर्धेसारखा दर्जा देऊन ते तेरसारख्या ग्रामीण भागात, राष्ट्रीय स्पर्धेचा आयोजन करणारे, जिल्हा सचिव श्रीयुत अमोल कस्तुरे, सेवानिवृत्त संजय पानसे, बसवेश्वर पाळणे. रोहन कोणाळे, सागर पाळणे, पदवी विशेष प्राविण्यासह मिळविलेल्या, वैभव अंजीखाने दहावी व कुस्ती विशेष प्राविण्यसह, सर्व गुणवंतांचा सन्मान मंडळाच्या वतीने प्राध्यापक गजानन गवळी, मूर्तिकार काशिनाथ दिवटे, संजय पाळणे, अॅड. अमोल दिवटे, अभिजीत घुटे, मुकुंद घुले, विद्या साखरे, योगेश हुच्चे, श्रीकांत दिवटे, विश्वास दळवी, दुर्गेश दिवटे, यांच्या शुभहस्ते मंडळाचे श्री ची प्रतिमा, सन्मानपत्र व शेला देऊन सन्मान करण्यात आला. 

 या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे लहान थोर कार्यकर्ते पूजाविधी अत्यंत मंत्र उच्चार, घंटानाद ,ढोल, ताशाचा नाद, सवाद्याने नगरी दुमदुमली होती यावेळी जमलेल्या गणेश भक्तांना पेढे व प्रसाद वाटप करून जय हिंद ,वंदे मातरम व भारत माता की जय या घोषणेने व फटाक्याच्या आतशबाजीने समारोप करण्यात आला. प्राध्यापक भालचंद्र हुच्चे यांनी संचलन व आभार  मानले.

 
Top