परंडा /प्रतीनीधी-

परंडा तालुक्यातील सिना - कोळेगाव प्रकल्प शंभर टक्के सलग तिसऱ्या वर्षी पुर्ण क्षमतेने भरल्याने खाली वाहुन जाणारे अतिरिक्त पाणी आनाळा उपसा सिंचन योजनेमध्ये सोडण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्याकडे केली होती या मागणीची तात्काळ दखल घेत आरोग्य मंत्र्यानी संबंधीत यंत्रणेला पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. 

बुधवार दि.२८ रोजी सकाळी आकरा वाजता जि.प.चे माजी उपअध्यक्ष धनजंय सावंत यांच्या हस्ते प्रत्यक्ष धरणावर जावुन विदयुत मोटार चालु करुण प्रत्यक्ष पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला.सध्या आनाळा उपसा सिंचन योजनेत पुर्ण भरण्यासाठी सांडव्यापासुन दोन मीटर पाणी कमी आहे.आनाळा उपसा सिचंन योजनेचा साठवन तलाव पुर्ण क्षमतेने भरल्यास आनाळा, इनगोंदा, वाटेफळ, कार्ला, मुगाव, रत्नापुर, मलकापुर या परिसरातील हजारो हेक्टर जमीन पुर्ण क्षमतेने ओलीताखाली येणार आहे.

 गेल्या वर्षापासुन मा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या प्रयत्नाने या तलावात पाणी सोडले जात आहे त्याच अनुशंगाने या वर्षीही सुदैवाने सिना - कोळेगाव धरण पुर्ण क्षमतेने भरल्यानतंर खाली वाहुन जाणारे अतिरिक्स पाणी आनाळा उपसा सिंचन साठवण तलावात सोडण्यात आले आहे. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनमधे आनंदाचे वातावरण असुन आज प्रत्यक्ष पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यात आली यावेळी संबधीत अधिकारी, आनाळ्याचे सरपंच जोतीराम क्षिरसागर, उपसरपंच कल्याण शिंदे, सोनारीचे उपसरपंच अंगद फरताडे, पत्रकार निशीकांत क्षिरसागर, बिबिषण शिंदे, ग्रा.प. सदस्य अजित शिंदे, चांगदेव चव्हाण, उदयोजक नाना पवार,अशोक शिंदे, विनोद कदम, भारत जाधव,आंबादास क्षिरसागर,हनुमंत क्षिरसागर,दशरथ क्षिरसागर . मिटु कदम, पिंटु थोरात, आबा आणवने, अशोक गायकवाड, तात्या ढमे, यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपसस्थित होते.


 
Top