परंडा प्रतिनिधी - 

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय परंडा या महाविद्यालयास नुकतेच भारत सरकारचा २०२१-२०२२ चा जिल्हा स्वच्छ  पुरस्कार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते महाविद्यालयास प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

 कोविडच्या कालावधीमध्ये महाविद्यालयाने घेतलेल्या जबाबदारी व नियोजन बद्दल तसेच महाविद्यालयातील परिसर व त्याची स्वच्छता याबद्दल शासनाने महाविद्यालयास दोन वेगवेगळ्या विभागामध्ये दोन पुरस्काराने सन्मानित केले आहे. 

या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक विभाग अशा विविध विभागामध्ये उल्लेखनीय काम केल्यामुळे दोन्ही विभागात पाच स्टार रेटिंगने सन्मानित करण्यात आले .

     श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांच्या पुढाकाराने  आणि माजी प्राचार्य डॉ.दिपा सावळे व नुकतेच कार्यरत झालेले प्राचार्य डॉ.सुनील जाधव  यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयातील विविध विभागाचा विकास व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या सर्व गोष्टींचा विकास करण्यासाठी त्यांचे प्रोत्साहन मिळाले व त्याचीच प्रचिती म्हणून हे यश महाविद्यालयास मिळाले आहे. महाविद्यालयास मिळालेल्या या यशामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील व डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या अनेक महाविद्यालयांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.


 
Top