तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर शहरासह परिसरात  मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन  उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीतुळजाभवानी मंदीर राजेशहाजी महाद्वारावर प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार योगिता कोल्हे, तहसिलमध्ये तहसिलदार सौदागर तांदळे, नगरपरिषद मध्ये मुख्याधिकारी अरविंद नातू, पोलिस ठाण्यात पो.नि अदिनाथ काशीदसह शासकीय निमशासकीय कार्यालय, शाळा, काँलेज येथे ध्वजारोहन करण्यात आले.

 मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हुतात्मा स्मारकाचे पूजन करण्यात आले.  तसेच मु्क्तीसंग्रामात सप्टेंबर १९४८ मध्ये आपल्या प्राणाचे बलिदान दिलेल्या वीर हुतात्मा सैनिक जमादार हरीराज सिंह आणि जमादार मांगेराम यांच्या समाधीस्थळाचे संस्थेच्या वतीने पूजन करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष किरण हंगरगेकर, कार्याध्यक्ष संदीप गंगणे, उपाध्यक्ष जीवनराजे इंगळे, सचिव देवेंद्र पवार, शिवशंकर भारती, बाळासाहेब चिखलकर, अाण्णासाहेब क्षीरसागर, कुमार टोले, रामेश्वर गाडे, अमर वाघमारे, दास पाटील, दत्ता सोमाजी, दाजी माने, विजय मलकुनाईक आदींची उपस्थिती होती 


 
Top