कळंब   / प्रतिनिधी-

ओबीसी मधून आरक्षण मिळवण्यासाठी कळंब च्या उपविभागीय अधिकारी यांच्या कचेरीवर हजारो  मराठ्यांचा महामोर्चा धडकला ,

या वेळी मोर्चातील केवळ ७ मुलींनी उपविभागीय अधिकारी यांना  कार्यालयात जाऊन निवेदन दिले.

 यावेळी मराठा समाजाने आपल्या विविध मागण्याचे निवेदन दिले. यात मराठवाडयातील मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातील घटनात्मक आरक्षण लागू करणे व  मराठा समाजाच्या नोकरी व शिक्षणातील आरक्षणासह इतर प्रमुख मागण्यंा करण्यात आल्या. प्रत्येक जिल्हयाच्या व तालुक्याच्या ठिकाणी ८ लाख पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मराठा विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह उभा करावेत, मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जो पर्यंत निकाली निघत नाही ,तोपर्यंत कोणती ही नोकर भरती करु नये तसेच कोणत्याही निवडणुका पण घेऊ नयेत

, तसेच प्रमुख मागण्या तातडीने मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी विशेष लक्ष दयावे यासाठी आज.दि.१९ सप्टेंबर २०२२ रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने कळंब जि.धाराशिव मध्ये हजारो  मराठा समाज बांधवांनी मोर्चा काढला. त्यानंतर आपल्या विविध  मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी , यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले .


यांनी जोपासली सेवाभावी वृत्ती

या मोर्चात सहभागी झालेल्या मराठा  बांधवांना जैन युवक मंडळ जैन समाजाच्या वतीने  वतीने चहा , अविष्कार मोबाईल शॉपी यांच्या वतीने मठ्ठा , पाटील मेडिकल यांच्यावतीने केळी ,आझाद ग्रुप यांच्या वतीने पिण्याचे पाणी ,नुराणी अक्वा यांच्यावतीने पिण्याचे पाणी व गुलाबाचे फुल देऊन मोर्चातील मराठा बांधवांचे स्वागत करण्यात आले .  गायत्री कॉम्प्युटर व  कीर्ती जनरल स्टोअर्स यांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. तर सभास्थळी समीर मुल्ला यांच्या वतीने बिस्किटाचे वाटप करण्यात आले .


 
Top