तेर /  प्रतिनिधी 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे  पोषण महाअभियान अतंर्गत अंगणवाडी क्र. 7 तेर मध्ये सुपोषण दिवस साजरा करण्यात आला.  

 बालकांचे आणि माताचे सुपोषण व्हावे आणि सुदृढ बालके व्हावी म्हणुन चौकस आहाराचे महत्व  तेर बीट च्या पर्यवेक्षिका मनीषा पाटील  यांनी सांगितले .तसेच अंगणवाडी तील सदृढ बालक वीर थोडसरे आणि माता प्रियंका थोडसरे यांचा पर्यवेक्षीका पाटील  यांच्या हस्ते सत्कार केला .

यावेळी आशा स्वयंसेविका पोर्णिमा झाडे यांनी स्वच्छता आणि लसीकरण या विषयावर माहिती सांगितले .या कार्यक्रमांचे सुत्रसंचालन जोशीला लोमटे यांनी केले तर आभार अर्चना सोनवणे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी कार्यकर्ती रोहीणी कांबळे,सरोजा वाघमारे,मदतनिस मीरा खरात ,आश्विनी खंदारे ,महादेवी शिंदे यांनी परिश्रम घेतले .

या कार्यक्रममध्ये अंगणवाडी कार्यकर्ती प्रभावती वाघमारे,लिलावती लोमटे,दैवशाला ढवन,सखुबाई राऊत,अर्चना सलगर,रईसा बागवान शईदा शेख,मिना बंडगर , प्रियंका थोडसरे,समिना फकिर,आश्विनी काशिद,भाग्यश्री साखरे,हिना पठाण व इतर माता भगिनी आणि बालक उपस्थित होते .


 
Top