उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तुळजापूर येथे श्री.तुळजाभवानी संस्थान मध्ये श्रीदेविजींचा शारदीय महोत्सव संपन्न होत आहे. महोत्सव कालावधीत भाविकांच्या सुरक्षिततेसाठी दि.17 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर 2022 या कालावधीत श्री. तुळजाभवानी मंदिर येथे 200 मीटर परिसरात सोललेले नारळ व सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तेंव्हा भाविकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन तहसिलदार तथा मंदिर संस्थानाच्या व्यवस्थापक योगिता कोल्हे यांनी केले आहे.


 
Top