वाशी  / प्रतिनिधी-

 येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयात अकरावी  विज्ञान वर्गात नव्यानेच प्रवेश घेऊन समाविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यां तर्फे स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला होता.

 याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र कठारे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून वाशी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती प्रियंका फंड मॅडम , विज्ञान विभागाचे समन्वयक श्री अजितकुमार तिकटे सर, श्री श्रीकांत  गपाट सर, श्रीमती. छाया नखाते मॕडम  उपस्थित होते. अकरावी विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांचे बारावी विज्ञान वर्गातील विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 

 याप्रसंगी  पीआय प्रियंका फंड  यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना कॉलेज जीवनातील विविध बाबीचे अनावश्यक अट्रॅक्शन व त्यामुळे होणारे दुष्परिणाम याबाबतीत विद्यार्थ्यांना माहिती करून दिली. प्राचाऱ्यांच्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयातील विविध सोयी सुविधा याची माहिती नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना प्राचार्यांनी करून दिली या कार्यक्रमाच्याप्रसंगी विद्यार्थी ,विद्यार्थिनी , शिक्षक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहिल शेख व कु. पूजा कातुरे  यांनी केले तर प्रास्ताविक कुमारी सोनाली मांडे हिने केले . आभार कुमारी पूजा कातुरे हिने मानले. कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीताने केली गेली.


 
Top