वाशी / प्रतिनिधी-

 धाराशिव जिल्ह्यातील प्रवेशद्वार असलेले पारगाव येथे युवा सेनेचे सचिव वरून सरदेसाई यांचे युवा सेना , शिवसेना यांच्या वतीने धुमधडाक्यात स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गौतम लटके , युवा सेनेचे जिल्हाप्रमुख डॉ चेतन बोराडे , वाशी तालुका प्रमुख विकास मोळवणे , युवा सेना जिल्हा सरचिटणीस महेश आखाडे , तालुका संघटक तात्यासाहेब बहिर  , युवा सेना तालुकाप्रमुख बालाजी लाखे , शाखा प्रमुख किशोर आखाडे इत्यादी पदाधिकाऱ्यानी सत्कार केला .

यावेळी   वरून देसाई यांनी फुटलेल्या चाळीस आमदारांचा  चांगलाच समाचार घेतला . येणाऱ्या काळात यांना जनता  धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही . असे ते म्हणाले.  कार्यक्रमाच्या वेळेस महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पारगावच्या वतीने देसाई याचा सत्कार करण्यात आला . उपस्थित विभाग प्रमुख तात्यासाहेब गायकवाड ,  बाळासाहेब उंद्रे , बंडू मुळे , बाबासाहेब गावडे  , पिनू गायकवाड , स्वप्नील लाखे , मोहन सुबुगडे , श्रीनिवास उंद्रे , अभय  गिराम , सतीश कोठावळे , बालाजी गिराम , अभय थोरात प्रवीण खवले , कंपू इंगोले , अजय भराटे , आदी पदाधिकारी युवा सेना ,  शिवसेना पंचक्रोशीतील शिवसैनिक , युवा सैनिक , महाविकास आघाडीतील पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते .


 
Top