वाशी / प्रतिनिधी-

 शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाशी येथे दिक्षांत समारोह आयोजित करण्यात आला होता. हा दिक्षांत समारोह कर्मवीर मामासाहेब जगदाळे  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र व्यंकटराव कटारे यांच्या शुभ हस्ते पार पडला. यावेळी संस्थेचे गट निदेशक देविदास वाघमारे, शिल्प निदेशक डॉ. किरण झरकर, गोवर्धन सोनवणे, सौ. वैशाली साळवे, जानकिराम राठोड, श्रीपाद औटी, देविदास येलगुंडे हे उपस्थित होते. यावेळी सरस्वती वंदना, जागतिक वास्तूविशारद विश्वकर्मा यांचे जीवन चरित्र व दिक्षांत समारोह आयोजित करण्यात आला होता.

   देशपातळीवर प्रशिक्षण सत्र २०२१ – २२ मध्ये अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा घेण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल घोषित झाला आहे. यावर्षी संस्थेतील कोपा व्यवसायासाठी अमीर दादामियाँ शेख, फॅशन डिजाईन एन्ड टेक्नॉलॉजी व्यवसायासाठी आनिषा नामदेवराव कवडे, पेंटर जनरल व्यवसायासाठी अशोक सुभाष पवार हे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. यासाठी शिल्प निदेशक डॉ. किरण झरकर, गोवर्धन सोनवणे, सौ. वैशाली साळवे यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय फॅशन शो मध्ये ऋतुजा मधुकर पिसाळ व शितल नंदकुमार सुतार यांची औरंगाबाद विभागात प्रथम क्रमांक मिळवला त्या बद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. किरण झरकर तर आभार प्रदर्शन जानकिराम राठोड यांनी केले.


 
Top