उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद शहरातील कोट गल्ली येथील स्व. विलासदादा शिंदे गणेश मंडळा तसेच गुजर गल्ली येथील त्रिमूर्ती गणेश मंडळ येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती व पूजन करण्यात आले. यावेळी देशातील सर्वसामान्य जनता, शेतकऱ्यांवरील संकट दूर होऊ दे असे साकडे विघ्नहर्ता गणरायाच्या चरणी घातले.

यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वासआप्पा शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भालेराव, मागासवर्गीय विभागाचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ शेरखाने, काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद, जिल्हा सरचिटणीस जावेद काझी, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक महेबूबपाशा पटेल, माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत, स्व. विलासदादा शिंदे गणेश मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत मुंडे, विजयकुमार शिंदे, श्रीकांत वडगावकर, अरुण शिंदे, आण्णासाहेब अचलेरकर, दिलीप मालखरे, नवनाथ डांगे, शिवाजी चव्हाण, प्रा.मोहन शिंदे, ऋषीकेश मुंडे, सोनू माणिकशेट्टी त्रिमूर्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रसाद नाना महामुनी, बाळासाहेब झाडे, प्रशांत बेद्रे, गोपाळ म्हेत्रे, संजय जहागीरदार, खरमाटे सर, डॉ.रोहन झाडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top