उस्मानाबाद / प्रतिनिधी-

प्रथमत: नेरुळचे वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यात परत आणा -खा. आरोप ओमराजे निंबाळकर यांनी  तुळजापूर तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील मंजूर रस्त्याचा उद्घाटन समारंभ प्रसंगी जळकोट येथे  केला

 नेरुळचे महाविद्यालय हे धाराशिवसारख्या आकांक्षीत जिल्ह्याच्या ठिकाणी असते तर कोरोना काळात रुग्णांना अत्यावश्यक सेवा देवून होणारी हेळसांड थांबवता आली असती. धाराशिव जिल्ह्यातील काही रुग्णांना नेरुळ येथील रुग्णालयातून मोफत उपचार केल्याबाबत कर्णाच्या उदारतेने सांगितले जाते पण हे करत असताना याची दुसरी बाजू जनतेपासून व स्वत:च्या राजकीय स्वार्थापोटी सविस्तरपणे लपवून ठेवली जाते. सदर रुग्णांचे उपचार हे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून केले जातात हे आजपर्यंत सांगण्याचे धाडस का केले नाही याचा जनता आज ना उद्या जाब विचारेल त्यावेळेस उत्तर द्याल का ? नेरुळचे वैद्यकीय महाविद्यालय हे खाजगी मालमत्ता असल्यासारखे आपण वागत आहात याचे अगोदर तेरणा ट्रस्टच्या सभासदांना स्पष्टीकरण द्यावे ?असे ओमराजे म्हणाले

 यावेळी धाराशिवचे माजी नगराध्यक्ष नंदु  राजेनिंबाळकर,  जगन्नाथ गवळी,   शामलताई वडणे,  कमलाकर  चव्हाण,   अशोक भाऊ पाटील,  गोपाळ सुरवसे,  बसवराज कवठे,  शिवाजी कदम,   सुधीर कदम, सुनील जाधव,   कृष्णनाथ मोरे,  अमीर शेख,   अजित चौधरी,  रोहित चव्हाण,  चेतन बंडगर, शरद पाटील, महेश पाटील, बाळकृष्ण घोडके पाटील,  संतोष पुदाले, सरदारसिंग ठाकूर, मेजर राजेंद्र जाधव,   रविंद्र दबडे,  दादा पाटील,  प्रसाद भोसले, राजेंद्र पाटील, गिरीष नवगीरे, गजेंद्र पाटील,  सुनीता पाटील  ,  अनिल जाधव, संगाप्पा धरणे,  ज्ञानेश्वर भोसले, आत्माराम साळूंके, सरपंच रवींद्र दबडे,  विकास सुरवसे दगडू नाना शिंदे, रामराव पाटील, श्रीमंत हवेकर, सुभाष गाढवे, बजरंग धोंगडे, केरनाथ भरगंडे, आप्पासाहेब पाटील, मोहन ढेकळे, संभाजी कोरे, अमोल जेटीभोर, नेताजी देवकर, मेजर जाधव   यांच्यासह नागरीक पदाधीकारी आणि शिवसैनीक उपस्थित होते.

 
Top