उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता या विभागांच्या माध्यमातून  हाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता कक्ष व इन्स्टिट्यूशनल इंनोवेशन कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र स्टार्टप यात्रेचे महाविद्यालयात आयोजन करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे ध्यास नाविन्याचा शोध नव उद्योजकाचा असा होता. या कार्यक्रमासाठी जिल्हा कौशल्य व उद्योजकता केंद्राचे सहाय्यक आयुक्त श्री संजय गुरव नॅशनल फेलो मोहम्मद रिजवान, जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक दत्तात्रय कांबळे, महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे समन्वय अक्षय गोपनारायण हे प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक म्हणून लाभले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण संशोधनाविषयी माहिती दिली आणि त्या नवनवीन  संकल्पनांना उद्योजकतेपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे आयोजन करून शासनाच्या वतीने आयोजित स्टार्टअप सादरीकरण स्पर्धेबद्दल माहिती देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक इन्स्टिट्यूशनल इंनोवेशन कौन्सिल चे समन्वयक डॉ.संदीप देशमुख सूत्रसंचालन डॉ. शिवाजी गायकवाड तर आभार डॉ.मारुती अभिमन लोंढे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील गुरूदेव कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.    सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. 

 
Top