लोहारा/प्रतिनिधी

लोहारा शहरातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन  आ.ज्ञानराज चौगुले यांच्या स्थानिक निधीमधुन प्रभाग क्रमांक 4 मध्ये विंधन विहिरी मंजुर करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक 4 मधील विंधन विहिर माजी नगराध्यक्षा पोर्णिमाताई जगदिश लांडगे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुर करण्यात आली आहे. 

प्रभाग क्रं.4 मधील बांदार गल्ली येथील विंधन विहिरीचे उद्घाटन दि.6 सप्टेंबर 2022 रोजी उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अभिमान खराडे, नगरसेवक तथा जिल्हा बोर्ड संचालक अविनाश माळी, रोहयो चे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख,पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे,युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार,मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले,ओम कोरे, शंकरराव वकील, नगरसेवक आरिफ खाणापुरे, बाळासाहेब कोरे,नगरसेवक प्रशांत काळे, नगरसेवक दिपक मुळे,एकबाल कुरेशी,दत्ता स्वामी,बाळु खताळ,प्रेम लांडगे,न्यायमत हिप्परगे,मुबारक हिप्परगे,अदि उपस्थित होते.

 
Top